नागाळा पार्कात ‘बिग मिश्रा पेढे’च्या फॅक्टरी आऊटलेटचे रविवारी उद्घाटन
–
उच्च प्रतीची, दर्जेदार आणि माफक दरातील मिठाई व नमकीन आता कोल्हापूरकरांना खास बॅण्डेड असलेल्या ‘बिग मिश्रा पेढे’ या नावाजलेल्या कंपनीकडून उपलब्ध होणार आहे. नागाळा पार्क कमानीजवळ या कंपनीचे भव्य फॅक्टरी आऊटलेट सुरू होत असून, या आऊटलेटचे उद्घाटन रविवार, दि. ८ फेब्रुवारीला दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय गणेश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची व्यवस्थापक श्रीधर बोरकर, विष्णू भांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
उद्योगात तब्बल दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘बिग मिश्रा पेढे’ या कंपनीने गुणवत्ता, चव आणि विश्वास यांची त्रिसूत्री जपली आहे. देशभरात या कंपनीचे १५० फ्रेंचाईजी व आउटलेट्स तसेच २५० डिस्ट्रीब्यूटर्स कार्यरत असून, आता कोल्हापूरमध्येही ग्राहकांना थेट फॅक्टरी दरात दर्जेदार मिठाई व नमकीन उपलब्ध होणार आहे.
नागाळा पार्क येथे सुमारे पाच हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक फॅक्टरी आऊटलेटमधून विविध प्रकारची उच्च दर्जाची मिठाई व नमकीन अतिशय माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध
होणार आहेत. विशेष म्हणजे लहान व्यावसायिक, बेकरी उत्पादक, हॉटेल व्यावसायिक यांना २०, २५ व ३०० टक्के सवलतीच्या दरात दर्जेदार मिठाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मिठाई ग्राहकांना उच्च प्रतीची मिठाई अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देणे’ हा ‘बिग मिश्रा पेढे’चा मुख्य उद्देश असून, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय मिश्रा यांनी दिली. ‘बिग मिश्रा पेढे’च्या फॅक्टरी आऊटलेटमुळे कोल्हापूरकरांना नामांकित बॅण्डची मिठाई थेट उत्पादकांकडून, तीही परवडणाऱ्या किमतीत मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पत्रकार परिषदेला धनश्री पब्लिसिटीचे ज्ञानदेव पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते.



