हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

Spread the news

हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

­

 

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा आयुक्त, वस्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांच्या दिशानिर्देशानुसार विभागीय स्तरावर प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूरच्या वतीने 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. सोलापूर येथे आयोजित करण्यात येत आहे.

  •  

राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग, विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते. या कापड स्पर्धेकरीता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपरिक व अपारंपरिक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविण्यपुर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शीत वाणामधून निवड करुन उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षिस देवून हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पारंपरिक व अपारंपरिक वाणाचे कापड उत्पादन करणाऱ्या विणकरांकरीता सन 2016-17 पासून विभागीय स्तरावर विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने हातमाग कापड स्पर्धेची पुनर्रचना करुन महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये ही स्पर्धा विभागीय हातमाग कापड स्पर्धा असे नामकरण करुन, विभागीय स्तरावर आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे.

विभागीय हातमाग कापड स्पर्धेकरीता पारंपरिक (साड्या, लुगडी, लुंगी, खणावळी, धोतरे, घोंगड्या इत्यादी) व अपारंपरिक (टॉवेल, चादरी, शर्टींग, कोटींग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, बॉल हॅगींग इत्यादी) वाणाचे हातमाग विणकरांनी त्यांनी हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नाविण्यपुर्ण वाण 9 मार्च पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पत संस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी आवार, सोलापूर येथे स्विकारण्यात येतील. या वाणाबाबतचा संपूर्ण तांत्रिक उत्पादनाचा तपशिल व विणकराचा तपशिल न चुकता सादर करणे आवश्यक राहील. 9 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वाणाचे नमुने स्विकारण्यात येत असून, तद्नंतर प्राप्त होणारे वाण स्विकारले जाणार नाहीत.

या कार्यालयास हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी विणकराकडून प्राप्त झालेल्या वाणाचे दिनांक. 10 मार्च रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रदर्शीत करण्यात येवून त्यामधून विभागीय हातमाग कापड निवड समिती मार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धा कार्यक्रमास हातमाग व्यवसायाशी संबंधीत हातमाग विणकरांना उपस्थित राहता येईल. तसेच स्पर्धेसाठी उत्पादनाचे वाण सादर केलेल्या विणकरांना या कार्यक्रमास न चुकता हजर राहणे आवश्यक आहे. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग घेवून प्रदर्शीत केलेल्या वाणामधून प्रथम पारितोषिक रु. 25,000/-, द्वितीय 20,000/- व तृतीय बक्षिस 15,000/- प्रमाणे पारितोषिक जाहिर करुन हातमाग विणकरांना समारंभाच्या वेळी प्रशस्तिपत्रकासह देण्यात येणार आहे.

विभागीय हातमाग स्पर्धेकरीता हातमाग सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उज्वला पळसकर, प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!