विद्याकोटी कुंकुमार्चन महापुजेचा उत्साहात प्रारंभ, आज महापुजेचे समापन होणार अध्यात्मिक साधनांयुक्त आयोजनाने उर्जा प्राप्त होते-न्यायमुर्ति सुमनश्याम

Spread the news

विद्याकोटी कुंकुमार्चन महापुजेचा उत्साहात प्रारंभ, आज महापुजेचे समापन होणार
अध्यात्मिक साधनांयुक्त आयोजनाने उर्जा प्राप्त होते-न्यायमुर्ति सुमनश्याम
कोल्हापूर ः गो-रक्षक, गो-भक्त पूज्य करपात्री महाराजांचे प्रशिष्य स्वामी अभिषेक ब्रम्हचारी व अन्य विद्वत पंडीतांच्या उपस्थितीत एक कोटीहून अधिक आवर्तनांच्या विद्याकोटी कुंकुमार्चन महापुजेचा गुरूवारी उत्साहात प्रारंभ झाला.
उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति ना. सुमनश्याम, न्यायमुर्ति ना. मकरंद कर्णिक व जैन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) ललित गांधी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने महापूजेचा मंगलमय प्रारंभ करण्यात आला.
पहिल्या दिवशी 200 हून अधिक महिला या महापुजेत सहभागी झाल्या. उद्घाटन प्रसंगी न्यायमुर्ति सुमनश्याम यांनी स्वामी अभिषेक यांना या आयोजनाबद्दल धन्यवाद देऊन विश्वाशांती व समाज कल्याणासाठी अशा अध्यात्मिक आयोजनांमुळे उर्जा प्राप्त होते असे सांगितले. न्यायमुर्ति ना. मकरंद कर्णिक यांनीही याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मनोगत व्यक्त करताना या महत्वपूर्ण आयोजनाच्या उर्जेमुळे कोल्हापूरच्या विकासाला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
त्रिपुरसंदुरी श्री ललितामातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्र‘म्हचारी यांनी आपल्या मनोगतात कोल्हापूरचे शक्तिपीठ हे अंबाबाईचे प्राचीन व महत्वपूर्ण स्थान असुन या स्थान महात्म्यामुळेच राष्ट्रीय आयोजनात आपण कोल्हापूर चा विशेष समावेश केल्याचे आवर्जुन सांगितले.
महापुजेचे आयोजन युवा चेतना संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री रोहीत कुमार सिंग यांनी प्रस्ताविक व आभारप्रदर्शन केले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!