….आणि डॉ. डी. वाय.परिवाराची पुण्याई फळाला आली!

Spread the news

….आणि डॉ. डी. वाय.परिवाराची पुण्याई फळाला आली!
आमदार सतेज( बंटी) पाटील साहेब यांचे सुपुत्र तेजस आणि स्नेहा यांच्या भव्य लग्न सोहळ्यानिमित्त काल शुक्रवारी, 27 मार्च, स्वागत समारंभ पार पडला. अचानक पडलेला पाऊस पण त्यांनंतर उत्साहाने झालेला समारंभ असा हा दिवस होता.
डॉ.डी वाय पाटील परिवाराची पुण्याई या निमित्तानं अनुभवायला मिळाली.

­

 

पोलीस ग्राउंड येथे या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. अत्यंत नियोजन पद्धतीने तेरा ठिकाणी लोकांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.
डॉ.संजय डी.पाटील साहेब, आमदार सतेज पाटील , ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजारहून अधिक कार्यकर्ते, मित्र आणि स्टाफ यासाठी मेहनत घेत होते. डॉ.पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनातून अनेकदा या व्यवस्थेची प्रत्यक्ष प्रॅक्टीस घेण्यात आली.

  •  

स्वागत समारंभ वेळ सायंकाळी 6 ची…नियोजनाची सर्व टीम सकाळपासून कामात व्यस्त… सायंकाळी 4.30 वाजता जेवण विभागात जबाबदारी असणारे सर्वजण सज्ज होते…आणि अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. पावसाचे थेंब सुरू झाले.

निमंत्रित तर येत होते. पण पाऊस सुरूच होता. सर्वांच्या मनात कुठेतरी अस्वस्थता आणि काळजी..
असे का ? हा प्रश्न सर्वांना सतावत होताच… पाऊस असाच सुरू राहिला तर जेवणाचे काय? स्वागत समारंभाचे काय ? अनेक प्रश्न….
पण सर्वजण सकारात्मक होते.
पाऊस थांबणार , कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार ,अशी भावना व्यक्त करत होते.

या परिस्थितीत महासैनिक दरबार येथील हॉलमध्ये निमंत्रितांसाठी जेवणाची सुरुवात करण्यात आली.
काही वेळातच पाऊस पूर्णपणे थांबला. हळू हळू लोकांची गर्दी सुरू झाली. वातावरणात गारवा निर्माण झाला, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, ऊर्जा आली…कार्यक्रम सुरू झाला.. उत्साहात पुढे पुढे गेला…हजारो निमंत्रितांनी आनंदाने जेवण केले..

या निमित्ताने डॉ.डी. वाय.पाटील परिवाराची आजपर्यंतची सगळी पुण्याई फळाला आली ..
आणि हा रात्री 11.30 पर्यंत कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
जणू पावसाने नव- वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठीच हजेरी लावली असावी अशी सर्वांची भावना झाली


Spread the news

You may also like

error: Content is protected !!