जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला आमदार सतेज पाटील : कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Spread the news

जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला
आमदार सतेज पाटील : कुटुंबियांची सांत्वनपर भेट

­

 

कोल्हापूर : जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने मराठा इतिहासाचा एक चालता-बोलता संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांनी शनिवारी डॉ.स्व.पवार यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी वसुधा पवार (काकी ) आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. आमदार पाटील म्हणाले, पवार कुटुंबाशी आमचे नाते हे स्नेह, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या धाग्यांनी विणलेले आहे. या कठीण प्रसंगी मनात असंख्य भावना दाटून आल्या. जयसिंगराव पवार यांचे मार्गदर्शन प्रत्येक पावलावर प्रेरणा देत राहील. यावेळी त्यांची कन्या डॉ. मंजुश्री पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास कदम, अरूंधती पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!