केडीएल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून
केडीएल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या ६ व्या वर्धापन दिननिमित्त केडीएल प्रीमियर लीग या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिनांक ७ आणि ८ एप्रिल रोजी शास्त्री नगर मैदानावर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत कोल्हापूर शहर व उपनगरातील वाहन व्यवसाय आणि जुनी कार खरेदी विक्री करणाऱ्या सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. एकूण १६ संघ यामध्ये स्पर्धा खेळतील. यामध्ये अण्णा मोटर्स, गवळी मोटर्स, ओम मोटर्स, साई व्हील्स, आय कार्स, युनिक कार्स, श्री मोटर्स, सोना कार्स, स्वामी मोटर्स, शिवानंद मोटर्स, डी मोटर्स, बाबा मोटर्स, प्रगती मोटर्स, एस एम मोटर्स, कोल्हापूर DSA आणि पांजरपोळ यांचा समावेश आहे. स्पर्धेचा सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण महापौर सौ.रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शास्त्रीनगर ग्राउंड येथे होणार आहे.अशी माहिती राष्ट्रीय खेळाडू दाऊद पठाण आणि सचिव इजाज नागरकट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विजेत्या संघाला चषक आणि अकरा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. सर्व संघांना किट देण्यात येणार असून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक, मॅन ऑफ द मॅच अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेस राजेश घोरपडे, दाऊद पठाण, सुधाकर सासणे , महेश संकपाळ, फय्याज अथणीकर, सचिव इजाज नागरकट्टी आदी उपस्थित होते.





