Spread the news

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त शुक्रवारी कागलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

­

 

शासकीय होमिओपॅथि महाविद्यालय व रुग्णालयाचे आयोजन

  •  

कागल, दि. ८:
जागतिक होमिओपॅथी दिन आणि होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, कागल यांच्यावतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि होमिओपॅथीक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, गैबी चौक, गुरुवार पेठ- कागल येथे संपन्न होईल. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अभिजीत अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, होमिओपॅथी उपचार पद्धतीबद्दल जनजागृती करणे आणि सर्वसामान्य जनतेला या उपचार पद्धतीचा लाभ मिळवून देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात नामांकित होमिओपॅथी तज्ञांकडून रुग्णांची तपासणी होणार आहे. प्रामुख्याने कॅन्सर, मधुमेह, ॲनिमीया, मूळव्याध, यकृत आणि किडनी आजारांवर विशेष सल्ला व उपचार दिले जातील. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची मोफत नोंदणी केली जाणार असून. त्यांना विनामूल्य सल्ला आणि होमिओपॅथीक उपचार देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

होमिओपॅथी ही एक नैसर्गिक आणि दुष्परिणामरहित उपचार पद्धती आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन शिबिराचे आयोजक अधिष्टाता डॉ. अभिजित अहिरे यांनी केले आहे. शिबिरासाठी येताना रुग्णांनी आपल्या जुन्या तपासणीच्या फाईल्स सोबत आणाव्यात. नोंदणीसाठी 08856978777 या फोन नंबरवर संपर्क साधावा.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!