AISSMS IOIT मध्ये VYOMA’26 नॅशनल लेव्हल प्रोटोटाइप स्पर्धेचे यशस्वी आयोजन
पुणे,– AISSMS IOIT च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या IEI स्टुडंट्स चॅप्टरतर्फे, VYOMA’26 : नॅशनल लेव्हल प्रोटोटाइप स्पर्धेचे, २७ मार्च रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ आणि ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा विभागांमध्ये प्रोटोटाइप सादरीकरणे झाली, जिथे नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळाला. ₹३०,००० च्या बक्षीस निधीसाठी तांत्रिक कौशल्यांची चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्यातून सीओईपी पुणे, ए.आय.एस.एस.एम.एस सी.ओ.ई, व्हीआयपी पुणे, पीव्हीजी पुणे, आर आय टी इस्लामपूर सांगली, तेरणा इन्स्टिट्यूट मुंबई इत्यादी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र बाहेरील राज्यातून श्री शंकराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी रायपूर, छत्तीसगड आणि व्हीआयपी वेल्लोर तामिळनाडू येथील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. हार्डवेअर डोमेन मध्ये, प्रथम क्रमांक ए.आय.एस.एस.एम.एस आय.ओ.आय.टी. येथील विद्यार्थ्यांनी, द्वितीय क्रमांक राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर सांगली यांनी आणि बेस्ट इनोव्हेशन हा पुरस्कार, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज व विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी पटकावला. सॉफ्टवेअर डोमेन मध्ये प्रथम क्रमांक हा पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे, द्वितीय क्रमांक ए.आय.एस.एस.एम.एस. आय.ओ.आय.टी. पुणे आणि बेस्ट इनोवेशन चा पुरस्कार राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर सांगली, पटकन यांना मिळाला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यार्थी प्रतिनिधी समीर पांडे व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. ए. डी. शिराळकर- IEI स्टुडन्ट चाप्टर समन्वयक, डॉ. ऋतुजा गाडगीळ-विभाग प्रमुख, विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि डॉ. प्रदीप. बी. माने, प्राचार्य-आय.ओ.आय.टी. पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती, सचिव श्री. सुरेश प्रताप शिंदे, या देशपातळीवरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल, आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





