कोल्हापूरात विनफास्ट ईव्हीची भव्य मोबिलिटी आणि डीलरशिपचं उदघाट्न संपन्न.

Spread the news

कोल्हापूरात विनफास्ट ईव्हीची भव्य मोबिलिटी आणि डीलरशिपचं उदघाट्न संपन्न.

­

 

घाटगे ग्रुपच्या साधना ऑटोमोबाईल एल. एल. पी. च्या वतीने कोल्हापुरात सुरु झालेल्या ‘विनफास्ट’ या इलेक्ट्रिक कार्स डीलरशिपचं उदघाट्न आज थाटामाटात संपन्न झालं. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विनफास्ट इंडियाचे सी. इ. ओ. तपनकुमार घोष तसेच विनफास्ट इंडियाचे सिनियर मॅनेजर (सेल्स अँड नेटवर्क डेव्हलपमेंट) मंचित हांडा यांच्या हस्ते हा उदघाट्न सोहळा संपन्न झाला. यावेळी घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे, साधना ऑटोमोबाईल एल. एल. पी. चे मॅनेजिंग पार्टनर तुषार घाटगे व्यासपीठावर उपस्थित होते.

  •  

या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतांना तुषार घाटगे यांनी घाटगे ग्रुपच्या वाटचालीचा आढावा घेतला. वाहतूक व्यवसायापासून सुरुवात करून नंतर कुरियर सेवा, विविध कंपन्यांच्या ऑटोमोबाईल डीलरशिप्स व या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांबरोबर जोडल्या गेलेल्या नात्यांचा त्यांनी उल्लेख केला. विनफास्ट कोल्हापूर या नवीन सुविधेमुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हिएतनाम येथील विन ग्रुपने भारतात 5 हजार कोटीची गुंतवणूक केली आहे. लवकरच भारतात विनफास्ट टू व्हिलर इव्ही पण लाँच करणार आहेत. आता घाटगे ग्रुपमध्ये विनफास्ट ही नवीन डीलरशिप सुरु झाली आहे. घाटगे ग्रुप दरवर्षी 15 हजार वाहनं विकतो आणि तितकीच नाती निर्माण करतो. ग्राहकसेवा हेच ध्येय मानून घाटगे ग्रुप काम करत आहे. विनफास्ट कोल्हापूरच्या माध्यमातून घाटगे ग्रुपच्या अविरत सेवेची परंपरा यापुढेही सुरु राहील असं आश्वासन तुषार घाटगे यांनी केलं.

विनफास्ट इंडियाचे सी. इ. ओ. तपनकुमार घोष यांनी आपल्या भाषणात विनफास्ट कार्स आणि कंपनीबद्दल विस्तृत माहिती दिली. विनफास्टकडून भारतात मोठी गुंतवणूक केली जात असून यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती तर होईलच, शिवाय पर्यावरण पूरक आणि ग्राहकांना समाधान देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सही भारतात बनतील असं प्रतिपादन केलं. भारतातील कार उत्पादन प्रकल्प फक्त 17 महिन्यात उभा केला जाईल. आणि यातून दरवर्षी 50 हजार वाहनांचं उत्पादन केलं जाईल. सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत विनफास्टच्या 50 डीलरशिप आणि 130 सर्व्हिस सेंटर्स उभी केली आहेत. याच महिन्यात विनफास्टची 7 सीटर कार भारतीय बाजारात दाखल होईल. याचबरोबर विनफास्ट कोल्हापूर ही नवीन डीलरशिप कंपनीच्या “स्मार्टर वे टू ड्राइव्ह” या ध्येयाला बळकटी देणारी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी विनफास्ट कोल्हापूरला शुभेच्छा देतांना घाटगे ग्रुपच्या ग्राहकांभिमुख सेवेचं कौतूक केलं. बदलत्या कोल्हापुरात अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक विनफास्ट कार्स नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असं प्रतिपादन त्यांनी केलं. कोल्हापूरचा ग्राहक चोखंदळ आहे. त्यांना सतत नवीन काही हवं असतं. विनफास्ट कोल्हापूरच्या माध्यमातून इथल्या ग्राहकांच्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील आणि त्यांना उत्तम सेवाही मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला घाटगे कुटुंबियांसोबत बँकर्स, विविध इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी, मान्यवर ग्राहक तसेच घाटगे ग्रुपमधील सर्व कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मोनिका जाजू यांनी केलं.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!