राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र क्रियाशील कार्यकर्त्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात डॉक्टर प्रविण कोडोलीकर लिखित राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवादल” ग्रंथाचे पुनर्प्रकाशन

Spread the news

कोल्हापूर :- भारतीय संविधान हीच राष्ट्रीय एकात्मतेची जननी आहे. याच उद्दिष्टांनी राष्ट्र सेवा दलाचे काम चालते तेच डॉक्टर प्रवीण कोडोलीकरांनी राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवा दल या ग्रंथात अधोरेखित केले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र हास्य जत्रा चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केले.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र क्रियाशील कार्यकर्त्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात डॉक्टर प्रविण कोडोलीकर लिखित राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवादल” ग्रंथाचे पुनर्प्रकाशन मा. न्यायमूर्ती प्रकाश परांजपे , लोकमतचे संपादक संजय आवटी, महाराष्ट्राची हास्य जत्रा चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय संविधान आणि यातील नियमावली ही तरुणांच्या मध्ये रुजवली गेली नाही तर, आता जो अनागोंदी काळ सुरू आहे तो पुढे आणखीन अंधारमय होईल, हे वास्तव लक्षात घेऊन तरुणांच्या मध्ये संविधान राष्ट्रीय एकात्मता शिकवते. आणि हीच एकात्मता सारे भारतीय असल्याचे ग्वाही देईल. त्यासाठी हा ग्रंथ मोठ्या प्रमाणात तरुणांच्या मध्ये वाचणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयीन स्तरावर सेवा दलाने व्यापक पणाने करावे असे त्यांनी सुचित केले.
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, माझी विश्वस्त प्रख्यात ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते व चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजा आवसक यांची विशेष उपस्थिती होती.

­

 

 

  •  

चौकट:- प्रकाशनानंतर हा ग्रंथ विक्रीसाठी खुला केला, महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हा ग्रंथ मोठ्या संख्येने विकत घेतले, त्यातून मिळालेल्या रकमेपैकी ग्रंथाचे लेखक डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांनी 50 टक्के रक्कम मेळाव्या साठी देणगी म्हणून संयोजकांच्याकडे सुपुर्त केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!