वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट “निसर्गदूत – प्राचार्य डॉ.मधुकर बाचूळकर –चोळेकर”या पुस्तकात लेखक डॉ.मधुकर येवलुजे
यांनी सविस्तरपणे मांडला आहे.
एक पर्यावरणप्रेमी प्राध्यापक, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय काय करू शकतो ,याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.वनौषधींचं संरक्षण -संवर्धन करण्यापासून ,कास पठाराला “जागतिक वारसा ” मिळवून देण्यापर्यंत त्यांचं योगदान आहेच . परंतु “इंडाल” सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या विरोधात जाऊन, खाणकामा विरुद्ध लढा देऊन, कंपनीस देशातून हद्दपार करणारा, नव महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पास, शक्तिपीठ महामार्गास विरोध करुन,जैवविविधता, पर्यावरणासाठी पाय रोवून यशस्वी लढे देणारा हा ज्ञानोपासक, जनजागृती बरोबरच अनेक विधायक,सकारात्मक आणि संशोधनात्मक कार्यांमध्ये कसं यशस्वी योगदान देऊ शकतो ,तसेच कसा विद्यार्थीप्रिय, आदर्श-गुणवंत शिक्षक आणि कडक शिस्तीचा प्राचार्यही बनू शकतो, याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येते. अशा या
पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दि.२२एप्रिल २०२६ रोजी सायं 5.30 वाजता जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, शहाजी लॉ कॉलेज, (के.डी.सी सी.बॅंकेच्या शेजारी ) शाहूपुरी,कोल्हापूर येथे होणार आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावे,ही विनंती. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
निसर्ग- पर्यावरणप्रेमी संस्था, कोल्हापूर जिल्हा.
आपण मित्रमंडळीसह उपस्थित राहावे. धन्यवाद.🙏
डॉ. मधुकर बाचूळकर.




