ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे विद्यार्थिनींसाठी आधुनिक वसतिगृहाची पायाभरणी

Spread the news

पुण्यातील नामांकित शिक्षणसंस्था ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक मुलींच्या वसतिगृहाची पायाभरणी समारंभ उत्साहात पार पडला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, बदलत्या काळानुसार दूरशिक्षणाची गरज ओळखून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी ही संस्था विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार शिक्षण देत असल्याचे नमूद केले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!