प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे निधन

Spread the news

­

­

 

प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे निधन

  •  

कोल्हापूर
सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर अनेक वर्षे कार्य केलेले प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप(८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जन शनिवार दि. 2 मे रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

प्राचार्य जगताप हे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले. 1994 ते 2001 या कालावधीमध्ये त्यांनी सांगोला महाविद्यालय सांगोला या ठिकाणी प्राचार्य म्हणून महाविद्यालय विकासामध्ये विशेष योगदान दिले.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये येऊन संघर्ष करून त्यांनी विविधाअंगी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या शिकवणुकीचा व आदर्शाचा अवलंब करून आयुष्यभर कार्य केले. यामध्ये प्रामुख्याने राज्यस्तरीय हॉलीबॉल रेफरी बोर्डाचे चेअरमन म्हणून अनेक वर्षे निष्पक्षपणे कार्य केले. गडहिंग्लज येथील प्रसिद्ध शिवराज महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे सचिव व ट्रस्टी म्हणून ही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.

सेवानिवृत्तीनंतर साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन , डॉ.आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, बॅरिस्टर पी.जी. पाटील प्रतिष्ठानचे संचालक, ज्येष्ठ नागरिक कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष, सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही अनेक वर्ष निस्वार्थीपणे कार्य केले. अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना स्थिरस्थावर करण्यापर्यंतचे कार्य पालकत्वाच्या भूमिकेमधून पार पाडले.

त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. सुहासिनी जगताप, ज्येष्ठ कन्या डॉ. मधुरा वाकचौरे,नातवंडे असा परिवार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!