मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून देणार : आमदार ज .मो . अभ्यंकर

Spread the news

मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून देणार : आमदार ज .मो . अभ्यंकर
कोल्हापूर :राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन मुंबई विभागाचे शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी केले .ते खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे हे होते .
आम ज .मो . अभ्यंकर यांनी खाजगी प्राथ .शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेला भेट देऊन खाजगी प्राथ .शाळांच्या विविध मागण्यावर चर्चा केली . यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ . शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष व पतसंस्थेचे संस्थापक भरत बा.रसाळे यांच्या हस्ते त्यांचा कोल्हापुरी फेटा , सन्मानचिन्ह , शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी भरत रसाळे यांनी खाजगी शाळांना सध्या भेडसावणाऱ्या प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये राज्यातील खाजगी प्राथ शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजेच्या रोखीकरणचा लाभ मिळाल पाहिजे ,मेडिकल बिलांची शंभर टक्के रक्कर राज्य शासना कडून मिळावी , शाळांना वेतनेतर अनुदान मिळावे ,
टीईटी रद्द करावी, संचमान्यता त्रुटी दूर कराव्यात व शिक्षक भरती करांवी या प्रमुख मागण्यास इतर अठरा मागण्याचे निवेदन त्यांना दिले . यावेळी बोलताना आम . अभ्यंकर यांनी सांगितले की “माझ्या अनुभवाचा उपयोग शिक्षण क्षेत्राला व्हावा ही माझी भूमिका आहे .खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण्याचा लाभ मिळाला पाहिजे याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव मा .शिक्षण संचालक कार्यालयाकडून मा सचिव यांच्या कडे मंत्रालयामध्ये गेला असेल तर मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन या प्रश्नाचा अंतिम निर्णय लागे पर्यंत प्रयत्नशील राहू अशा प्रकारची ग्वाही दिली . या भेटीच्या वेळी स्वागत व प्रास्ताविक संतोष आयरे यांनी केले .संस्थेचा कामाचा आढावा चेअरमन साताप्पा कासार यांनी सांगितला तर आभार संचालक महादेव डावरे यांनी मानले . सूत्रसंचालन शिवाजी सोनाळकर यांनी केले . यावेळी शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष सरोदे , वसंत चव्हाण , डॉ खान सर , पुर्ण विभागाचे समन्वयक सुनील जगताप , नायडू सर , रंगराव कुसाळे याच्यासह रणदिवे सर ,विशाल लोहार हे सहभागी झाले होते .
या कार्यक्रमास संचालक सर्जेराव नाईक, रोहिणी एडगे , वर्षाराणी वायदंडे अरुण गोते ,राजेंद्र कोरे,कृष्णात चौगुले , संभाजी सुतार ‘ दशरथ कांबळे , चंद्रकांत वाकरेकर, व्यवस्थापक सदाशिव साळवी यांच्यासह सर्व कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!