शापूरजी पालोनजी चे भागीदार दिलीप ठाकर यांची बालाजी कलेक्शनला सदिच्छा भेट

Spread the news

शापूरजी पालोनजी चे भागीदार दिलीप ठाकर यांची बालाजी कलेक्शनला सदिच्छा भेट

­

 

मुंबईतील नामांकित रिअल इस्टेट उद्योजक व अनुभवी अग्रगण्य बिल्डर दिलीप ठाकर यांनी आज बालाजी कलेक्शन ला सदिच्छा भेट दिली.

  •  

त्यांनी सांगितले की, कोल्हापूर विभागातील ग्राहक आता केवळ घर खरेदी करत नाहीत, तर जीवनशैलीचा दर्जा, सुविधा आणि गुणवत्तेलाही अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे आगामी काळात या भागातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येईल.

रिअल इस्टेट क्षेत्रातील पाच दशकांहून अधिक अनुभव असलेले दिलीप ठाकर यांनी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये SD Corporation या संस्थेची स्थापना त्यांनी Shapoorji Pallonji Group यासारख्या नामांकित रियल इस्टेट कंपनीत भागीदारी केली होती. मुंबईतील प्रसिद्ध The Imperial या आलिशान जुळ्या टॉवर्सच्या विकासात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

सध्या ते D&A Realty या संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील वांद्रे परिसरात ‘Cassias’ आणि ‘West Shore’ सारखे प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करत आहेत. रिअल इस्टेट व्यतिरिक्त, भारतात टेट्रापॅक तंत्रज्ञान आणण्यात तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

या भेटीदरम्यान बालाजी कलेक्शनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. व्यवसायातील गुणवत्ता, ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी आणि आधुनिकतेचा स्वीकार याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली.

स्थानिक पातळीवर फॅशन, विवाह खरेदी आणि आधुनिक शॉपिंग संस्कृतीसाठी ओळख निर्माण केलेल्या बालाजी कलेक्शनच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. शहराच्या व्यापारी आणि आर्थिक विकासात अशा उद्योजकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

बालाजी कलेक्शनचे संस्थापक श्री प्रशांत पोकळे, प्रकाश पोकळे, सुनील जोशी व श्रीनिवास अय्यर समवेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!