सुमित कुमार यादव यांनी कोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार
कोल्हापूर -केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) कोल्हापूर आयुक्तालयाचे आयुक्त म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी सुमित कुमार यादव (आय.आर.एस) यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारतेवेळी त्यांनी वस्तू व सेवा कर (GST) प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरण, पारदर्शकता व करदात्यांना प्रभावी सेवा देण्यावर यावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी प्रलंबित जीएसटी संबंधी प्रकरणांचा वेळेत विनियोग, डिजिटल प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा अधिक गतिमान करणे व महसूल वृद्धीसाठी समन्वयात्मक प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नव्या आयुक्तांचे स्वागत करून जीएसटी व्यवस्थेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.





