NEET पेपर फुटीप्रकरणी निपक्षपातीपणे तपास होवून सर्व दोषी व्यक्तिंवर कठोर कारवाई करणेबाबत …

Spread the news

NEET पेपर फुटीप्रकरणी निपक्षपातीपणे तपास होवून सर्व दोषी व्यक्तिंवर कठोर कारवाई
करणेबाबत …

­

 

  •  

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली NEET UG 2026 परीक्षा पेपरफुटी आणि मोठ्या
प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारांमुळे देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी

फिरवणान्या या पेपरफुटीचा तसेच या पेपर फुटी मध्ये सामील असणान्या सर्व व्यक्तींचा महाराष्ट्र

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन तीव्र निषेध करत आहे. क्लास संचालक दोष आढळल्यास त्याच्यावरही

कठोर कारवाई करावी. संघटना कोणत्याही दोषी क्लास संचालकांच्या पाठीशी राहणार नाही. पी टी ए

ही संघटना गेली 26 वर्ष नेहमीच, सर्वसामान्य, प्रामाणिक क्लास संचालकांच्या हितासाठी कार्यरत

राहिलेली आहे.

दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करणाऱ्या लाखो गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य यामुळे टांगणीला
लागले आहे. पेपरफुटीला जबाबदार असणान्या रॅकेटवर, भ्रष्ट अधिकान्यांवर आणि या प्रकरणात
सहभागी असणा-या खाजगी क्लासेस चालकांवर कठोर कारवाई व्हावी.

या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करत आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना अटक
करून कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही करत आहोत.

या प्रकरणातील गुन्हेगारांना जलद गतीने शिक्षा मिळण्यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालयांची (Fast
Track Courts) स्थापना करण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल
आणि दोषींवर जलद कारवाई होईल.

नीट (NEET) सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत होणान्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा
पद्धतीचे केंद्रीय स्तरावर आधुनिकीकरण आणि कठोर कायदे करण्याची नितांत गरज आहे. यामध्ये
ऑनलाईन परीक्षांचा अवलंब, कडक सुरक्षा यंत्रणा आणि NTA या संस्थेच्या कारभारात पारदर्शकता
आणणे आवश्यक आहे. संपूर्ण परीक्षा एकाच दिवशी न घेता टप्प्याटप्प्याने किंवा विविध सत्रांत
(Multiple Shifts) घेण्याचे नियोजन करता येऊ शकते. यामुळे प्रश्नपत्रिका फुटला आळा बसेल.

पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेतली जाईल,”
अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे याचे आम्ही स्वागत करत आहोत. ही
परीक्षा वर्षातून दोन वेळा JEE च्या धरतीवर NEET परीक्षा घेण्यात यावी. अनेक परीक्षा स्लॉट ठेवावेत
आणि गुणांच्या सामान्यीकरण करण्यासाठी Percentile पध्दतीचा वापर करावा. युनियन पब्लिक
सर्व्हिस कमिशन प्रमाणे भारतीय राज्यघटनेखाली स्वतंत्र घटनात्मक अशी एजन्सी गठीत
करण्यासाठी कायदा करुन, त्याव्दारे NEET ची परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी आम्ही सरकार
कडे करत आहोत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!