डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये शासनमान्य सुविधा केंद्र
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक ) , कोल्हापूर हे तंत्रनिकेतन डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनमान्य सुविधा केंद्र (Facilitation Center) म्हणून कार्यरत असून प्रक्रियेसंदर्भातील सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
सुविधा केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग, कागदपत्रांची पडताळणी, कागदपत्रे अपलोड करणे , अर्ज निश्चिती अशा सर्व सुविधा उपलब्ध असून , डिप्लोमा नंतरच्या व्यवसाय /नोकरीच्या संधी, कॅप राउंडची संपूर्ण माहिती तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत दिली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इन्स्टिट्यूटने विशेष नियोजन केले आहे. ” तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आयोजित डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दिनांक 20 मे ते 22 जून या कालावधीत अर्ज निश्चिती करण्याची आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध सर्व शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजना यांची सविस्तर माहिती सुविधा केंद्रामार्फत देत आहोत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रविवारसह सर्व दिवस सुविधा केंद्र सुरू असेल ” अशी माहिती संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी दिली. डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील विविध अभ्यासक्रमांचे माहितीदर्शक फलक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदर्शित केले आहेत . तरी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे .





