भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबईदिनांक: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का

Spread the news

भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबईदिनांक: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!मुंबई:वसई-विरार परिसरामध्ये शिवसेना (UBT) गटाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. येथील शिवसेना (UBT) युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सिद्धेश रवींद्र जोगळे आणि तब्बल ४४ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ शाखाप्रमुख प्रभाकर गोपाळ पाटील यांच्यासह वसई-विरार शहर महानगरपालिकेचे उमेदवार, अनेक विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि सोशल मीडिया प्रमुख यांनी आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चात (BJYM) अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार भागात या धडाडीच्या युवा आणि ज्येष्ठ रक्ताच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे.हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालय येथे आज, मंगळवार दिनांक २६ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. हा सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस (प्रदेश महामंत्री) श्री. सुनीलजी राणे आणि सन्माननीय खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. हा पक्ष प्रवेश घडवून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) प्रदेश उपाध्यक्ष व वसई-विरारचे नगरसेवक श्री. गणेश पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका पार पाडली. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक, प्रदेश महामंत्री श्री. सुनीलजी राणे आणि खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्यासह उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सर्व नवीन सहकाऱ्यांचे पक्षात अधिकृतपणे स्वागत केले.या सोहळ्यात युवासेना जिल्हा प्रमुख (पालघर) सिद्धेश रवींद्र जोगळे, ज्येष्ठ शाखा प्रमुख प्रभाकर गोपाळ पाटील, मनपा प्रभाग २९ च्या उमेदवार सोनल रवींद्र जोगळे, विभाग प्रमुख (पेलहार) दिलीप कुवेसकर, विभाग प्रमुख मनीष गायकवाड, उप विभाग प्रमुख जितेश पवार, विभाग प्रमुख शैलेंद्र गोलवणकर, विभाग अधिकारी ओंकार चाफेकर, विभाग संघटक जरीना सय्यद, मनपा निवडणूक उमेदवार अँडव्होकेट किरण म्हात्रे, युवासेना उपशहर अधिकारी लक्ष्मण गवारे, युवासेना शाखा अधिकारी आसिफ पठाण, शाखा प्रमुख जहीर नूर मोहम्मद अन्सारी, शाखा प्रमुख परमसिंग भारद्वाज, युवासेना विभाग अधिकारी नवाज सय्यद, युवासेना विभाग अधिकारी अझर सय्यद, शाखा अधिकारी सुमित शर्मा, शाखाप्रमुख अकबर अली शहा, उपशाखाप्रमुख नितीन भालेकर, सोशल मीडिया प्रमुख शिवचरण सुदर्शन यादव, सोशल मीडिया प्रमुख अजेंद्र पशुपती यादव, अँडव्होकेट सचिन गुप्ता, ॲड विनय त्रिलोककिनाथ तिवारी, अभिषेक महाजन (कल्याण), ओम प्रकाश अशोक गुप्ता, आरिफ सदरुद्दीन खान, सर्वेश सुनील गोड, आदित्य延 गुप्ता, प्रशांत संतोष वघ, मोनू वीरेंदार गुप्ता आणि शैलेदार भोलानाथ यादव यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.या वेळी उपस्थित नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अंत्योदय संकल्पनेमधून समाजातील शेवटच्या युवकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच राष्ट्रनिर्माणाच्या विचारांवर विश्वास ठेवून हे सर्व पदाधिकारी पक्षात सामील झाले आहेत. या प्रवेशामुळे वसई-विरारमधील प्रत्येक युवकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे आणि विकास अधिक वेगाने पोहोचेल, असा विश्वास या वेळी नेत्यांनी व्यक्त केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वसई-विरारमध्ये जोमाने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!