वाढदिवसाला वह्यांची भेट…गरजू विद्यार्थ्यांना देणार ६ लाख ५२ हजार वह्या थेट* *सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे सोमवारी वाटप*

Spread the news

*वाढदिवसाला वह्यांची भेट…गरजू विद्यार्थ्यांना देणार ६ लाख ५२ हजार वह्या थेट*
*सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटप*

­

 

  •  

*कोल्हापूर :* नेत्यांच्या वाढदिवस म्हणजे भलेमोठे फ्लेक्स, हारतुरे अन पुष्पगुच्छ…मात्र, याला फाटा देत वाढदिवसाला विधायकतेचे रुप दिल्याने काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला तब्बल ६ लाख ५२ हजार ८५० वह्या जमल्या होत्या. या भेटरुपी संकलित झालेल्या वह्यांचे जिल्ह्यातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना उद्या सोमवारी वाटप करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या हस्ते जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सकाळी 10 वाजता वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी नवज्योत सिंग संधू,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहप्रभारी शांभवी शुक्ला, माजी आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, गगनबावडा पंचायत समिति सभापति छाया देसाई, राधानगरी पंचायत समिति सभापति आर वाय पाटील, कोल्हापूर महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला २००७ पासून वह्यांचे संकलन केले जाते. २०२६ पर्यंत ७६ लाख ८५ हजार ६४४ वह्या जमा झाल्या. या वह्या १६ लाख ९० हजार ८६५ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. या सामाजिक बांधिलकीची २०१४ मध्ये लिम्का बुक ऑफ रॅकॉर्डसमध्ये नोंद झाली. तर २०१६ मध्ये वर्ल्ड रेकॉर्डस इंडियानेही याची दखल घेतली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!