महाराष्ट्र चेंबर अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे बिनविरोध

Spread the news

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्ष पदी रवींद्र माणगावे यांची व
उपाध्यक्ष पदी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची बिनविरोध निवड
पश्चिम महाराष्ट्र विभागातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह दहा जणांची
गव्हर्निंग कौन्सील सदस्य पदी बिनविरोध निवड
कोल्हापूर दि. ०३: राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यवसाय व  कृषी क्षेत्राची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्ष पदी सांगलीचे प्रसिध्द उद्योजक रवींद्र परिसा माणगावे यांची व प श्चिम महाराष्ट्र विभागातून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय धनपाल शेटे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. तसेच गव्हर्निंग कौन्सील सदस्य पदी आमदार राजेंद्र शामराव पाटील- यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद शंकरराव माने, राजू तुकाराम पाटील, प्रशांत शशीकांत शिंदे, अजित सोहनलाल कोठारी, धनंजय सुरेश दुग्गे, संजय कुमार पाटील, धैर्यशील हिंदुराव पाटील, गोरख शंकर माळी, नंदकुमार रमणलाल शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई ही संघटना पुढील वर्षी शताब्दी वर्ष साजरे करत असून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील व्यापार-उद्योगाचे प्रश्न सोडविले जातात. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमासह शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले. तर राज्य स्तरासह स्थानिक पातळीवरील व्यापारी-उद्योजकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणेसाठी उपाध्यक्ष या नात्याने कटीबध्द असल्याची ग्वाही संजय शेटे यांनी दिली.
सदर निवडींबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह गव्हर्निंग कौन्सील सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!