नंदादेवी बाभुळकर कुपेकर यांना कोणी अधिकार दिला?
ॲड.अनिल घाटगे
चंदगड विधानसभा उमेदवार डॉ. नंदादेवी बाभुळकर यांनी अति उत्साहात पक्षाचा कोणताही आदेश नसताना महायुतीला पर्यायाने ना. हसन मुश्रीफ यांना दूध संघ व के.डी.सी. बँक निवडणूकीमध्ये जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा गडहिंग्लज येथे केली. प्रदेश कार्यालयाकडून अथवा जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचेकडून कोणत्याही सूचना नसताना त्यांना हा अधिकार कोणी दिला. त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. नुकत्याच झालेल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सर्किट हाऊस येथील शाहू सभागृहात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असे सांगितले असताना. त्याचबरोबर अजितदादांच्या दुःखद निधनानंतर हा विषय पूर्णतः थांबवला असून महाविकास आघाडी बरोबर एकत्रित काम करावयाचे आहे असा आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला असताना नंदादेवी बाभूळकर यांनी व्यक्तिगत भूमिका पक्षाला गृहीत धरून करू नये.
गोकुळ दूध संघ व के. डी. सी. बँक या दोन्ही ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे सन्मानपूर्वक जागा पक्षाला मिळतील हे लक्षात ठेवा कोणाच्याही पाठीमागून जावयाचे नाही लवकरच प्रदेश कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल होईल हे सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
ॲड अनिल घाटगे
कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार




