सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाजातील जणगणना व शैक्षणिक विषयावर आज दि १७ रोजी सायकाळी ५.३० ला बैठक

Spread the news

शरणु शरणार्थी, सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाजातील जणगणना व शैक्षणिक विषयावर आज दि १७ रोजी सायकाळी ५.३० ला बैठक सेवासदन हॅास्पिटल येथे डॉक्टर रविकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत व राष्ट्रीय लिंगायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरण प्रदिप बापू वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली , यामध्ये समाजातील अनेक मान्यवर हिंदू लिंगायत वीरशैव संघटना पदाधिकारी रामदास देशिंगे , निलेश हिंगमिरे, राजू कोरे , संधाई यांनी आपली भूमिका मांडली, पंरतु त्यांच्या मागण्या मध्ये हिंदू लिंगायत लिहीण्यामध्ये लिंगायत समाजाला काय फायदा/ तोटा होईल हे स्पष्ट नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील बैठकीत कागदपत्रे सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी राष्ट्रीय बसव दल , जागतिक लिंगायत महासभा , राष्ट्रीय लिंगायत संघ, भारत 🇮🇳 यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये आरक्षण, अल्पसंख्याक दर्जा, धर्म मान्यता, शिक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नामदेव कोरे , सुरेश पाटील, सुभाष सायगावे , संजय कोरे, सुनील कित्तुरे , राहुल कुंभार, गडकरी, अमोल बोळाज यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. डॅा रविकांत पाटील यांनी सांगितले कि, समाजातील प्रत्येक घटक चा फायदा लक्ष्यात घेतला जाईल व निर्णय घेतला जाईल. महात्मा बसवणा यांचा फोटो व घोषणा देऊन सत्कार करण्यात आला व पुढील काळात मिटींग घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. संजय परमणे यांनी आजची शिक्षण व्यवस्था तसेच समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. लिंगायत धर्म मागण्यासाठी काय करावे लागेल हे जेऊर सरांनी प्रश्न उपस्थित केला, तसेच हिंदू धर्म नसल्याने वैदिक/ सनातन असा उल्लेख का केला नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले , पण यावर उत्तर देताना कार्यकर्ते अस्वस्थ झाले, जैन , शीख धर्मातील लोक धर्म व अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला यावर चर्चा झाली. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे स्पष्ट दिसत होते त्यामुळे पुढील आठवड्यात काय निर्णय घ्यावा याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!