आमदार अमल महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट

Spread the news

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित विविध विषयांवर निवेदन दिले. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, राधानगरी, तुळशी सारख्या मोठ्या, लघु आणि मध्यम प्रकल्पांसोबतच इतर जलाशयांमधील गाळ काढून पाणी साठा वाढवण्या संदर्भात कृती आराखडा तयार करावा. कोल्हापूर पोलीस मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी नवीन इमारती आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता द्यावी. महाराष्ट्र शासन ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करण्यासाठी निधी द्यावा तसेच राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासंदर्भात व्यापक बैठक घ्यावी या मागण्यांचा समावेश होता.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!