गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखल* *राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची माहिती

Spread the news

*गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखल*

­

 

*राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची माहिती*

  •  

कोल्हापूर, दि. १:
गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज बुधवार दि. एक म्हणजेच अखेरच्या मदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखल केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी ही माहिती दिली. ठरावसंखेच्या या उच्चांकी आकड्याबद्दल श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी ठराव धारकांसह राष्ट्रवादीची नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ठराव दाखल करण्याच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात म्हणजेच बुधवार दि. २४ जून २०२६ अखेर परस्पर आलेल्या ठरावांची संख्या ६१८ होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शक्ती प्रदर्शनाने गुरुवारी दि. २५ रोजी १७४३ ठराव दाखल केले. सोमवारी दि. २९ रोजी १०१ व मंगळवार दि. ३० रोजी १११ ठराव दाखल केले. तसेच; अखेरची मुदत असलेल्या बुधवार दि. एक जुलै रोजी २१ ठराव दाखल केले. या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकूण १९७६ ठरावांचा उच्चांकी टप्पा यशस्वीरित्या पार केल्याचेही श्री. पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे.

[सोबत: तालुकानिहाय सविस्तर तक्ता….]
==========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!