श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना १हजार ५०० कंपास बॉक्स (साहित्यसह) मोफत वाटप

Spread the news

*श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना १हजार ५०० कंपास बॉक्स (साहित्यसह) मोफत वाटप*
गेली 19 वर्ष श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या माध्यमातून श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या परगावच्या भाविकांसाठी मोफत भोजन प्रसाद दिला जातो. त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी श्री महालक्ष्मी अन्नछत्र चे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या ९ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या शाळांना १हजार ५०० कंपास बॉक्स (साहित्यसह) वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. हा शुभारंभ राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर या महानगरपालिकेच्या शाळेतून करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या *महापौर सौ. रुपाराणी निकम* व चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक श्री. प्रशांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सदर कार्यक्रमाचे *महापौर रुपाराणी निकम* यांनी कौतुक करून गौरव काढले. तसेच
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी मनःपूर्वक स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विराज कुलकर्णी व प्रतिक गुरव यांनी केले.याच बरोबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांना कंपास बॉक्स वाटप करण्यात येणार आहे. सदर शाळा खालील प्रमाणे १) बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर २) शाहू शाहीर आमदार पी.बी. साळुंखे कन्या विद्यामंदिर 3) दत्ताजीराव माने विद्यालय 4) महाराणी ताराबाई विद्यालय ५) महाराणा प्रताप हायस्कूल ६) शिवराज विद्यालय ७)अहिल्याबाई सेंट्रल प्रायमरी स्कूल ८)द्वारकानाथ कपूर विद्यालय ९)संत रोहिदास विद्यामंदिर १०)शेठ रामनारायण रुईया विद्यालय ११)कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर १२) रावबहादुर विचारे विद्यामंदिर
*”शिक्षण हीच खरी संपत्ती… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न!”* 📖✏️

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!