डिजीटल क्राईमचे प्रकार वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे – मा. अजय सावंत कोल्हापूर दि.08 गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, इंडियन घूमन्स सायंस्टिस्ट असोशिएनशन व श्रीमती सुशिला देवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन यांच्यावतीने संयुक्तरित्या मा. अजय सावंत (सायबर शाखा महाराष्ट्र पोलिस कोल्हापूर) यांचे सायबर सुरक्षा जागरुकता या विषयावरील विशेष व्याख्यान गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये संपन्न झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मंजिरी मोरे होत्या. मा. अजय सावंत यांनी बोलताना सायबर क्राईम म्हणजे संगणक, मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहीती चोरी, बेकायदेशीर गुन्हा तसेच संगणक प्रणाली हॅक करणे आदि प्रकार दिवसेंदिवस बाढत असून फिशींगदवारे बँकेची खोटी माहीती किंवा मेसेज पासून तुमचे युजरनेम आणि पासवर्ड चोरले जातात. हँकिगदवारे कोणत्याही परवानगीशिवाय दुस-या संगणकामध्ये किंवा खात्याची माहिती घेवून फसवणूक करणे तसेच आर्थिक फसवणूक ही ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑफरच्या नावाने खात्यातून पैसे काढणे, सोशल मिडीयादवारे त्रास देणे व बदनामी करणे डेटा चोरी व फोटो चोरीदवारे लोकांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असून नागरीकांनी दक्ष राहणे गरजेचे असून त्वरीत महाराष्ट्र सायबर पोलीसांशी त्वरीत संपर्क साधावा तसेच 1945 या हेल्पवाहिनीशो संपर्क साधावा, डिजीटल अरेस्ट हा प्रकार वाढत असून पोलीस तथा सीबीआय, बैंक अधिकारी असल्याचे भासवून Whatsup व skyep वर व्हिडीओ कॉल करुन खोटया गुन्हयात अडकवण्याचा प्रकार गंभीर असून आर. एफ.आय.डी. रेडिओ फ्रिववॅन्सी आयडेंटी फिकेशन वायरेल तंत्र ज्ञानाच्या माध्यमातून रेडिओ लहरींचा वापर करुन टेंग व रिडरच्या माध्यमातून तुमच्या एटीएम माध्यमातून पैसे काढले जातात, ते एटीएम धरकांना समजत नाही त्यामुळे क्यू आर दवारे, गूगलपे, फोनपे वर आर्थिक व्यवहार करताना संबंधित व्यक्ती किंवा कंपनीशी संपर्क साधून खात्री करुन आर्थिक व्यवहार करावेत नाहीतर आर्थिक फसवणूकीला बळी पडू शकतो. तसेच वेबसाइट वरील महितीत फेरफार होण्याचा धोका वाढत असल्यामुळे संस्थांनी, कंपन्यांनी वेबसाईट सेक्युर ऑडिट करावे असे मत व्यक्त केले. सा. ऋऋतुजा पृथ्वी मोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून अजय सावंत यांचा सत्कार करण्यात आला, रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत च प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. वी. भुयेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. बी. झावरे यांनी करुन दिला.




