विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त २६जुलै रोजी चित्रकला स्पर्धा स्पर्धेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे

Spread the news

*विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त २६जुलै रोजी चित्रकला स्पर्धा*

­

 

*स्पर्धेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे*

  •  

कागल,प्रतिनिधी.

शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या २८ जुलै रोजी होणाऱ्या ७८ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.२६ जुलै २०२६रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.कागल तालुका व शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्र मर्यादित या स्पर्धा होतील. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रणित श्री छत्रपती शाहू कला, क्रीडा व संस्कृतिक मंडळाच्या वतीने सलग पंचविसाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची सुरुवात झाली.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा घेण्यात येत आहेत.

कागल, मुरगुड, सेनापती कापशी व कणेरी(ता.करवीर)अशा चार केंद्रावर एकाचवेळी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पहिली ते तिसरी,चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी,पाचवी ते दहावी व मतिमंद अशा सात विविध गटात स्पर्धा होतील. स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.सकाळी दहा वाजता सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर व मतिमंद या गटातील स्पर्धा सुरु होतील.तर दुसऱ्या सत्रात दुपारी दीड वाजता पहिली ते तिसरी व चौथी ते पाचवी या दोन गटातील स्पर्धा सुरु होतील.
पहिली ते तिसरी या गटातील स्पर्धकांना रंगीत खडू किंवा स्केच पेन वापरता येईल.पुढील गटातील स्पर्धकांना वॉटर कलर वापरण्याचे आहेत. मूकबधिर गटातील विद्यार्थ्यांना रंगीत खडू, स्केच पेन किंवा वॉटर कलर वापरता येणार आहेत. कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्यु.काॕलेज शिक्षण संकुल, मुरगुड येथे मुरगुड विद्यालय, सेनापती कापशी येथे न्यायमूर्ती रानडे विद्यालय तर कणेरी येथे श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्यु. कॉलेज या चार केंद्रांवर या स्पर्धा होतील.

या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे आपल्या शाळेमार्फत मुख्याध्यापकांच्या सहीने शुक्रवार दिनांक २३ जुलै २०२६अखेर वरील केंद्रांवर नोंदविणेची आहेत.
तज्ञ व नामवंत चित्रकारांकडून स्पर्धेचे परिक्षण करुन निकाल जाहीर केला जातो.तर विजेत्यांना समारंभपुर्वक बक्षिस वितरण व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र संबधित शाळेमार्फत पोहोच केले जाते.इच्छुक स्पर्धकांनी नजीकच्या केंद्रावर मुदतीत नावे नोंदवून या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!