Spread the news

*आषाढी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिरात ‘सूर सौरभ’ भक्तिसंगीत मैफलीचे रविवारी(ता.२६)आयोजन*

­

 

कागल, प्रतिनिधी :
आषाढी एकादशीचे औचित्य साधून कागल येथील श्रीराम मंदिरात रविवारी (ता. २६) सायंकाळी ६ वाजता ‘सूर सौरभ’ या विशेष भक्तिसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ महिला समिती, कागल आणि राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  •  

या सांगीतिक मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका डॉ. शितल धर्माधिकारी, शुभ्रा खाडे आणि गौरी शिंदे आपल्या सुमधुर स्वरांनी विठ्ठलभक्ती, अभंग आणि भक्तिगीतांची मेजवानी रसिकांना देणार आहेत. आषाढी एकादशीच्या पावन वातावरणात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली ही मैफल भाविकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.

या भक्तिमय संगीतमैफिलीला कागल परिसरातील संगीतप्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!