चंदगड बस डेपोच्या सेवेत ५ नवीन बस दाखल; लवकरच आणखी ५ बस उपलब्ध होणार!

Spread the news

चंदगड बस डेपोच्या सेवेत ५ नवीन बस दाखल; लवकरच आणखी ५ बस उपलब्ध होणार!

­

 

चंदगड बस डेपोच्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! आमदार मा. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्याला यश मिळाले असून चंदगड बस डेपोला ५ नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. तसेच लवकरच आणखी ५ नवीन बसही उपलब्ध होणार आहेत.

  •  

या नवीन बसमुळे चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज व आजरा परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

चंदगड बस डेपो अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार परिवहन सेवा मिळावी यासाठी आमदार मा. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना यश मिळाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार झाला आहे.

याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच परिवहन मंत्री मा. प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनःपूर्वक आभार!

चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सोयी-सुविधांसाठी असा विकासाचा प्रवास यापुढेही अविरत सुरू राहील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!