लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला इचलकरंजी लिंगायत माळी समाजाचा पाठिंबा

Spread the news

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला इचलकरंजी लिंगायत माळी समाजाचा पाठिंबा

­

 

इचलकरंजी : लिंगायत समाजाच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी आजपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला इचलकरंजी लिंगायत माळी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या उपोषणाच्या समर्थनार्थ समाजातील अनेक तरुण कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

  •  

लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या साखळी उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी इचलकरंजी लिंगायत माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. समाजाच्या मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी समाजाचे आधारस्तंभ श्री. मुकुंद महादेव माळी, समाजाध्यक्ष श्री. रमेश महादेव माळी, उपाध्यक्ष श्री. दीपक जोतिराम माळी, सेक्रेटरी श्री. दत्ता निशिकांत माळी, तसेच समाजातील ज्येष्ठ व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व श्री. हरिभाऊ माळी आणि श्री. सुहास माळी यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

लिंगायत समाजाच्या न्याय्य व महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला इचलकरंजी लिंगायत माळी समाज सदैव पाठिंबा देईल, अशी भूमिका यावेळी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे या मागण्यांसाठी पाठिंबा देत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!