*शनिवारी होणार्या भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीबद्दल उत्सुकता शिगेला*
खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दहीहंडीच्या तयारीची झाली पाहणी, सुरक्षेचे सर्व नियम पाळत साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीनं दहीहंडी सोहळा रंगणार आहे. तब्बल ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण झालीय. आज खासदार धनंजय महाडिक यांनी, दसरा चौक मैदानात जावून दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी केली. साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील. तसेच या स्पर्धेतून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले जाईल, असे खासदार महाडिक म्हणाले.
धनंजय महाडिक युवा शक्तीच्यावतीने दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडीचे आयोजन केले जाते. ३ लाख रुपयांचे बक्षिस असणारी ही दहीहंडी, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा शनिवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून, ऐतिहासिक दसरा चौकात युवा शक्तीचा दही-हंडी सोहळा रंगणार आहे. त्यासाठी दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली. मुख्य व्यासपीठाला लागून, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलीय. दोन क्रेनद्वारे सुमारे ४५ फुटांवर दहीहंडी टांगली जाईल. तर मानवी मनोर्यावरील सर्वात वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी, समीट ऍडव्हेंचर आणि हिल रायडर फौंडेशनतर्फे सेफ्टी बेल्ट असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची दहीहंडीला उपस्थिती असेल. आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दसरा चौक मैदानावरील दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली. युवा शक्ती दही-हंडी स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक गोविंदा संघांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण कार्यक्रम स्थळी उत्तम प्रकाशयोजना करण्यात आलीय. शिवाय दरवर्षीप्रमाणं यंदाही चॅनल बी वरुन दहीहंडीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सलामीपासून भरघोस बक्षिसे आणि मुख्य ३ लाखाचे बक्षिस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीचे यंदाचे मानकरी कोण असणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. शिर्डी टीएमटी स्टील, राजारामपुरीतील बालाजी कलेक्शन आणि एस राजू माने प्रणित एस फोर ए टायगर्स प्रस्तुत स्मार्ट सिटी हे या दहीहंडी उत्सवाचे प्रायोजक आहेत. आजच्या पाहणीवेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक रिंकू देसाई, गोकुळचे माजी संचालक धैर्यशिल देसाई, किरण नकाते, उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, संग्राम निकम, महेश पाटील, करण जाधव, भगवानराव काटे, अनिरुद्ध कोल्हापुरे, महेश माळगी, झाकीर जमादार, डॉ. आनंद गुरव, महेश वासुदेव, जयेश घरपणकर, अवधूत अपराध यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



