*शिक्षकांसाठी ‘आरोग्य कवच’ योजना राबवणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर* 

Spread the news

*शिक्षकांसाठी ‘आरोग्य कवच’ योजना राबवणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर*

­

 

 

  •  

*कोल्हापूर :* शिक्षक हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्यासाठी आनंद दिघे आरोग्य कवच योजना राबवणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित शिक्षक मेळावा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील 35 आदर्श शिक्षण संस्था, 21 आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले,  पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रभावी संवाद साधत मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली आहे. शिक्षकांना वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिलाच्या परताव्यासाठी विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. आधीच आजारपणाच्या मानसिक व आर्थिक तणावात असलेल्या शिक्षकांना या कागदोपत्री प्रक्रियेचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्यातील शिक्षकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच योजना’ सुरू करण्यावर सरकारचा भर राहील.

 

याचवेळी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंगेश चिवटे हेच योग्य उमेदवार आहेत.  “आम्ही सर्वजण मंगेश चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कामाला सुरुवात केली असून, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिनचेकर यांचे भाषण झाले.

मंगेश चिवटे म्हणाले, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न असतील.

यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ, कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख विजय बलगुडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जिल्हा समन्वयक विनायक साळोखे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हाप्रमुख मनमोहन खोत, महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई, शहरप्रमुख विनायक जाधव, अतुल साळोखे, नवनाथ खोत, फरीन मकुभाई, सचिन डोंगरे, रोहिणी सांबरेकर, संतोष पाटील, महेश धनवडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!