आमदार जयंत आसगावकर यांनी घेतली शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट

Spread the news

शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सो आमचे बरोबरीची भेट आज संपन्न झाली यामध्ये आमदार जयंत आसगावकर साहेब यांनी जुनी पेन्शन शासन देणार नसेल तर या कर्मचाऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्या असे सांगून हे कर्मचारी कोणत्याही नवीन पेन्शन मध्ये नसून या कर्मचाऱ्यावर हा अन्याय आहे असे सांगितले.जुनी पेन्शन समन्वयं संघांचे समन्वयक श्री बाबा पाटील यांनी 31ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयाने विना वेतन प्रतीलिपिक पदावरील कर्मचाऱ्यांना 2006-2007 मध्ये हजर होऊन सुद्धा शासन जुनी पेन्शन मंजूर करत असेल आणि इतर अनेक आस्थापना मध्ये 2005पूर्वी फक्त त्या पदाची जाहिरात निघाली असताना व हे कर्मचारी 2005नंतर हजर होऊन सुद्धा त्यांना जुनी पेन्शन लागू होतं असेल तर आम्हालाही मिळावी अशी मागणी केली. त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सर यांनी आम्ही कसे न्याईक आहोत हे पटवून सांगितले. श्रीकांत पाटील यांनी 2005 पूर्वीचे आम्ही 26000 कर्मचारी हा जुन्या पेन्शनचा शेवट चा टप्पा असून आपण त्यांना जुनी पेन्शन देऊन पुण्याई घ्यावी अशी विनंती केली. या सभेचे वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षणमंत्री महोदयांनी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली व याबाबत काही मुद्दे नोंद सुद्धा करून घेतले. पुढे त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बरोबर बैठक लावण्याचे आश्वासन दिले…….. पण पण शासनात बसलेले अधिकारी मात्र नक्कीच गेंड्याच्या कातडीचे आहेत.ते याबाबत नक्कीच सकारात्मक नाहीत त्यामुळे ते शासनाची दिशाभूल करत आहेत त्यामुळे त्यांनी न्यायालयीन बाब सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार विक्रम काळे यांनी तुम्ही जुनी पेन्शन द्या आम्ही सुप्रीम मधील केस मागे घेतो असे सांगितले.यावेळी भास्कर देशमुख यांनी 25 सप्टेंबर पूर्वी शासनाने निर्णय नाही घेतला तर 28सप्टेंबर पासून आम्ही आझाद मैदानावरती तीव्र आंदोलन व तदनंतर आमरण उपोषण करू असे सांगितले…..एकंदरीत पाहता आपणास तीव्र आंदोलना शिवाय पर्याय नाही… आत्ता सर्वांना घरातून बाहेर पडावेच लागणार.. आत्ता नाही तर कधीच नाही. एकच मिशन आमच्या जीवन मरणाची जुनी पेन्शन.. यावेळी आमदार ज्ञानेश्वर मात्रे, आमदार किरण सरनाईक मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, पोपट पाटील व संघटनाचे प्रतिनिधी उपास्थित होते..

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!