*भागवत श्रवणाने भक्तीरसात न्हाऊन निघाली कागल नगरी * *विविध उपक्रमांस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

Spread the news

*भागवत श्रवणाने भक्तीरसात न्हाऊन निघाली कागल नगरी *

­

 

*विविध उपक्रमांस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  •  

कागल: येथील श्रीराम मंदिर देवस्थान जीर्णोद्धार समितीच्या वतीने आयोजित भागवत सप्ताहाच्यानिमित्ताने आयोजित भागवत श्रवण, हरिनामाचा गजरआणि भगवंताच्या स्मरणाने कागल नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.या सप्ताहाची महाआरती व महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या कालावधीत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत कथा प्रवचनाचा लाभ घेतला.
कथाकार कांचनताई धनाले यांनी श्रीमद् भागवत महापुराणातील विविध प्रसंगांचे निरूपण केले. सप्ताहामध्ये श्रीशुक चरित्र, राजा परीक्षित चरित्र, ध्रुव आख्यान, नरसिंह अवतार, प्रल्हाद चरित्र, गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, बाललीला, गोवर्धन पूजा, रासक्रीडा, कंसवध तसेच श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह आदी प्रसंग भक्तिमय वातावरणात मांडले.
सांगता सोहळ्यात द्वारिका लीला, सुदाम चरित्र, उद्धव उपदेश व मार्कंडेय कथा यांचे निरूपण केले. त्यानंतर आरती होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
या धार्मिक सोहळ्यास राजपरिवरातील सुहासिनीदेवी घाटगे,नंदितादेवी घाटगे , राजे समरजितसिंह घाटगे, नवोदिता घाटगे ,श्रेया घाटगे, यशराजे घाटगे व श्रुती घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

छायाचित्र कागल येथे श्रीराम मंदिर मध्ये महाआरती वेळी राज परिवारातील सदस्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित महिला भाविक


Spread the news

You may also like

error: Content is protected !!