हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक आयडी बंधनकारक
कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी धान व ५ ठिकाणी नाचणी विक्री करिता ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू केली आहे. हंगाम २०२६-२७ मध्ये धानाचा (भात) दर रु. २४४१/- नाचणी रु. ५२०५/- प्रति क्विंटल हमीभाव शासनाकडून निश्चित झालेला आहे. सदर योजनेचा लाभ होण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जाऊन आधार कार्ड प्रत, आधार लिंक बँक खाते पासबुकची स्वयंस्वाक्षांकित प्रत, पीकपेरा नोंद असलेला अद्यावत ७/१२ व ८-अ उतारा, आणि अॅग्रीस्टॅक आयडी सादर करून ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.
धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी ऑनलाइन नोंदणीचा कालावधी दि. ०१.०९.२०२६ ते १५.१०.२०२६ पर्यंत असून कृषी विभागाकडून लागू करण्यात आलेल्या AgriStack या संकेतस्थळावर शेतकरी क्र. (Farmer ID) देणे बंधनकारक आहे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादित मुंबई या संस्थेचे कोल्हापूर विभागाचे संचालक मा. श्री. संदिप अरुण नरके व संचालिका मा. श्रीमती धनश्रीदेवी धनराज घाटगे यांनी शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
मे. कळावे.
आपला विश्वासू,
सुधीर एस. पाटील
जिल्हा पणन अधिकारी
कोल्हापूर



