रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज तर्फे ताराराणी विद्यापिठाच्या
” प्रिंस शिवाजी विद्यालय शाळेत” महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत ६० गरजू विद्यार्थीनींना शैक्षणिकरित्या दत्तक घेण्यात आले.
गेली सलग २६ वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कोल्हापूरच्या महापौर सौ रुपाराणी निकम यांच्या हस्ते विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे व गणवेष वाटप करण्यात आले.
शिक्षणामुळेच या देशात महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे मनोगत महापौर सौ रुपाराणी निकम यांनी व्यक्त केले. गेली अनेक वर्षे सातत्याने हा उपक्रम या शाळेत राबवल्याबद्दल त्यांनी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही गरजू विद्यार्थीनींना या योजनेअंतर्गत दत्तक घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सलग २६ वर्षे प्रोजेक्ट चेअरमन राहिलेले रोटरी सनराईजचे अॅड इंद्रजित चव्हाण यांनी उपक्रमाची सविस्तर माहीती दिली व उपक्रमाचे महत्व पटवून सांगीतले तसेच भविष्यात मुली याच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणार आहेत हे आवर्जून सांगीतले.
रोटरी सनराईज चे अध्यक्ष योगेश रास्ते यांनी भविष्यात अशाच पद्धतीने मुलींच्या शिक्षणासाठी क्लब विधायक कार्य सुरू ठेवेल अशी ग्वाही दिली.
यावेळी ताराराणी विद्यापीठाचे सेक्रेटरी प्राजक्त पाटील,रोटरी सनराईज चे सेक्रेटरी विजय कुलकर्णी, सदस्य उद्योजक विशाल जाधव, गौरव शहा,चंदन मिरजकर,यतिश शहा, दिलीप मोटवानी, डाॅ भारत कोटकर ,दिव्यराज वसा, प्रसाद अगरवाल, शिवप्रसाद रायबागकर, अभय बिचकर, सतिश छाब्रिया,कमला कॉलेज च्या प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, मुख्याध्यापिका नुतन आतराम तसेच शाळेचा स्टाफ, शिक्षकवर्ग,पालक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



