देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितजी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या भव्य शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.
ही बैठक माझ्यासह कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, कारखान्याचे माजी चेअरमन उत्तमआण्णा आवाडे, , सौ. मोश्मी आवाडे , कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका आवाडे यड्रावकर तसेच पोलीस अधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत आगामी शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, उपस्थितांची व्यवस्था तसेच विविध विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितजी शहा यांच्या उपस्थितीत होणारा हा भव्य मेळावा शेतकरी बांधवांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक, प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.