राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप.बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनकडून सन २०२५-२६ साठी गौरव; बँकेचा २७ वा पुरस्कार
कागल, प्रतिनिधी :
राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि., कागलला कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे सन २०२५-२६ चा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०१ ते १००० कोटी रुपये ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून राजे बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेला मिळालेला हा २५ वा पुरस्कार आहे.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे दरवर्षी सदस्य नागरी सहकारी बँकांमधून गटवार पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. या पुरस्काराचे वितरण बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे असोसिएशनच्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे.
कोट
सहकारमहर्षी स्वर्गीय राजेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची १००० कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून युवा उद्योजकांना कर्जपुरवठा करण्यात बँक राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. विविध कर्ज योजनांसह ग्राहकाभिमुख, विनम्र,तत्पर व जलद सेवेमुळे बँकेच्या प्रगतीला सातत्याने चालना मिळत आहे.
संचालक मंडळाचे नियोजन,त्यास व्यवस्थापनाची साथ,सभासद व ग्राहकांचा बँकेवरील विश्वास यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. मिळालेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार ही बँकेच्या पारदर्शि,गतिमान व ग्राहकाभिमुख कार्याची पावती असून, भविष्यातही ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यावर भर राहील.—सौ.नवोदिता घाटगे, अध्यक्षा
टीप- सदर बातमीत अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे फोटो वापरावेत ही विनंती



