आठवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन ४ ऑक्टोबरला

ॲड. कृष्णा पाटील संमेलनाध्यक्ष, उद्घाटक भदंत एस. संबोधी तर दंगलकार नितीन चंदनशिवे कवी संमेलनाध्यक्ष

Spread the news

आठवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन ४ ऑक्टोबरला
ॲड. कृष्णा पाटील संमेलनाध्यक्ष, उद्घाटक भदंत एस. संबोधी तर दंगलकार नितीन चंदनशिवे कवी संमेलनाध्यक्ष

­

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आठवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असून धम्मविचार, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध पैलूंवर दिवसभर विचारमंथन होणार्‍या या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साहित्यिक व विचारवंत ॲड. कृष्णा पाटील, उद्घाटक धम्म अभ्यासक भदंत एस. संबोधी तर दंगलकार नितीन चंदनशिवे कवी संमेलनाध्यक्ष असणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आणि संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी दिली.
संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावर्षीचा धम्मदीप ज्ञानसंवर्धन पुरस्कार-२०२६ जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपयांची पुस्तक असे आहे.
तसेच धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार-२०२६ यंदा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाचे संचालक सचिन मून आणि ज्येष्ठ धम्म अभ्यासक व विचारवंत रंगराव पांडे यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांची पुस्तक भेट असे आहे. या पुरस्कारांचे वितरण डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, स्वागताध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. स्वाती नांगरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या प्रसंगी प्रा. प्रमिलाताई माने, श्रीधर पाटील, जी. बी. कांबळे, छाया सूर्यवंशी, प्राचार्य एस. डी. डिसले, डॉ. सर्जेराव पद्माकर आणि डॉ. शोभा चाळके यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ४०० रुपये किमतीचा महाग्रंथ केवळ २०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संमेलनाचा प्रसार-प्रचार आपल्या गावात व शहरात करण्याचे, तसेच आपल्या संस्था किंवा परिसराच्या नावाने बॅनर व होर्डिंग लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
धम्मविचार, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आयोजित या संमेलनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. स्वाती नांगरे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला सुप्रभा चोपडे, विश्वासराव तरटे, सुनिल जाधव, विमल पोखर्णीकर गंगाधर म्हमाने, महेश तरटे उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!