गोकुळ दूध संघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार – मुरलीधर जाधव

Spread the news

गोकुळ दूध संघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार – मुरलीधर जाधव

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मी इतर मागास प्रवर्गातून अर्ज दाखल केला असून कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक ताकदीने लढविणार आहे. आजवरच्या कारकिर्दीत सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्काची लढाई तसेच शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी मी लढा दिला असून त्यांच्या पाठबळावर मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व गोकुळचे माजी संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.

­

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रखर विचाराने काम करणारा मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. रस्त्यावरची लढाई लढत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांशी माझी नाळ जोडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोकुळशी सलग्न असणारे साडेपाच लाख दूध उत्पादक हे लढणाऱ्या व काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नक्कीच राहतील असा मला विश्वास आहे.

  •  

मागील संचालक मंडळात अवघे दोन अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. अल्पकाळ काम करत असतानाही शेतकरी हित व गोकुळच्या हितासाठी मी कार्यरत राहिलो आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाराही तालुक्यात माझी प्रचार यंत्रणा कार्यरत असून प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. प्रचाराच्या चांगल्या प्रतिसादानंतर जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांचे आशीर्वाद माझ्यासोबत नक्कीच राहतील असा माझा विश्वास आहे.

मी शिवसेनेचा मूळ शिवसैनिक आहे. संघटना वाढीसाठी प्रचंड कष्ट केले आहेत. आंदोलन, मोर्चे व संघर्षाच्या माध्यमातून लावलेल्या शिवसेनेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यामध्ये माझ्यासारख्या लढणाऱ्या मूळ शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संघटनेतील मूळ शिवसैनिकाला गोकुळमध्ये संधी मिळणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने इतर मागास प्रवर्गातून गोकुळची निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढवणारच आहे.

मुरलीधर रघुनाथ जाधव
मा. जिल्हाप्रमुख – शिवसेना, कोल्हापूर
मा. संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!