दुर्दैवी घटना व आर्थिक मदत
कळे गावाशेजारी झालेल्या दुर्दैवी घटनेत सावेकर मंडपचे मालक श्री. सतीश सावेकर यांना वीजेचा शॉक लागून ते जखमी झाले होते, कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन वतीने केलेल्या आवाहनानुसार त्याच्या मदतीसाठी जमा झालेली रक्कम. रू.1,25,000.00 ती आज महाघुरळा चॅनेलचे संपादक व जेष्ठ पत्रकार मा.श्री.गुरूबाळ माळी यांच्या हस्ते व आपल्या संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.सागर(भाई) प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री.सतीश सावेकर यांच्या मातोश्रीच्या कडे सुपूर्त करण्यात आली. तसेच त्यांना कोणतीही अडचण आल्यास संघटना त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाहीही दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विनायक सुर्यवंशी , सुनिल व्हनागडे,नियाज पटवेगार , मुसाभाई शेख, किरण गवळी, वरूण जाधव, दिपक भोसले, निलेश चव्हाण , भारत जामदार ,झाकीर बागवान , धर्मेश बोगरे, गजानन पाटील टोपकर, बाबासाहेब बोरुडे, अजित साळोखे , शामराव कदम, वैभव बरगे, प्रभाकर निगडे, पांडुरंग बोगरे, स्वप्नील ठमके आदी उपस्थित होते
कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन



