नवरात्रोत्सवानिमित्त कागलमध्ये कुंकुमार्चन व ‘शक्ती’ गरबा-दांडिया उत्सव श्रीराम मंदिरमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नवरात्रोत्सवानिमित्त कागलमध्ये कुंकुमार्चन व ‘शक्ती’ गरबा-दांडिया उत्सव

Spread the news

नवरात्रोत्सवानिमित्त कागलमध्ये कुंकुमार्चन व ‘शक्ती’ गरबा-दांडिया उत्सव

­

श्रीराम मंदिरमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  •  

कागल, प्रतिनिधी : राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनअंतर्गत राजमाता जिजाऊ महिला समिती,श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समिती व विश्वमांगल्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सव २०२६ निमित्त कागलमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शुक्रवारी (ता.१६) श्रीराम मंदिरात दुपारी तीन ते पाच या वेळेत कुंकुमार्चन, तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत कुमारिका पूजन होणार आहे. यानिमित्त विश्वमांगल्य ग्रुपतर्फे श्रीसूक्त स्तोत्राचे पठणही करण्यात येणार आहे. महिलांनी कुंकुमार्चनासाठी, तसेच कुमारिका पूजनासाठी कुमारिकांची नावे श्रीराम मंदिरात नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शनिवारी (ता.१७) सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम मंदिर परिसरातील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर पटांगण, खर्डेकर चौक येथे ‘शक्ती’ गरबा-दांडिया उत्सव होणार आहे. ‘कलेतून आनंद, कलेतून सक्षमीकरण’ या संकल्पनेतून आयोजित उत्सवात गरबा-दांडिया स्पर्धा आणि टीम एम प्रितेश यांच्या लाइव्ह म्युझिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके दिली जाणार आहेत. महिलांना प्रवेश मोफत असून पुरुषांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.

You may also like

error: Content is protected !!