केडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा* *कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदा

Spread the news

*केडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा*

­

 

*कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदा*

  •  

*कर्मचाऱ्यांसह सहकारी संस्थांमध्ये समाधान*

*कोल्हापूर दि. ३०:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेच्या सभासद संस्थांना डिव्हीडंट पोटी रू. ३१ कोटी रुपये वर्ग केले आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपोटी तब्बल सव्वा आठ कोटी रुपये व अर्ध्या पगार बक्षीसपोटी पावणे चार कोटी रुपये, असे एकूण बारा कोटी रुपये अदा केले आहेत. दीपावलीच्या तोंडावरच घेतलेल्या बँकेच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसह व संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पंधरवड्यापूर्वी झालेल्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डिव्हिडंडचा हा निर्णय झाला होता. बँकेने ही सर्व रक्कम बँक कर्मचाऱ्यांच्या आणि संस्थांच्या खात्यांवर वर्ग केलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने जिल्ह्यातील सभासद सहकारी संस्थांना शेअर्स रकमेच्या दहा टक्केप्रमाणे ३० कोटी, ७८ लाख रुपये डिव्हीडंड अदा केला आहे. जिल्हाभरातील गावागावांमधील शेअर्स भागधारणा पूर्ण केलेल्या एकूण १२,०१७ सभासद सहकारी संस्थांना हा डिव्हीडंड वर्ग केला आहे. यामध्ये सहकारी साखर कारखाने, प्राथमिक विकास सेवा संस्था, सहकारी दूध संस्था, सहकारी पतसंस्था, सहकारी अर्बन बँका, सहकारी सूत गिरण्या, सहकारी पाणीपुरवठा संस्था इत्यादी प्रकारच्या संस्था केडीसीसी बँकेच्या सभासद आहेत. दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेकडे या संस्थांचे एकूण शेअर भांडवल ३३२ कोटी रुपये आहे.

केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या वर्षभराच्या एकूण मूळ पगार व महागाई भत्त्याच्या ९.१० टक्केच्या प्रमाणात होणारी ही एकूण रक्कम रू. ८ कोटी, २० लाख एवढी आहे. तसेच; १५ दिवसांच्या बक्षीस पगारापोटीची रक्कम रु. पावणेचार कोटी होते. असे दोन्ही मिळून एकूण बारा कोटी रुपये कर्मचाऱ्यांना अदा केले आहेत.

*उद्दिष्ट रू,. १५,००० कोटी ठेवींचे……….!*
बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उच्चांकी असा रुपये २८८ कोटी ढोबळ नफा व रुपये १०३ कोटी निव्वळ नफा झालेला आहे. बँकेच्या व्यवसायामध्येही मोठी वाढ होवून तो रुपये २१,३७१ कोटी झालेला आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये संचालक मंडळासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच सन २०२६-२७ साठी बँकेने १५,००० कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. ठेव उद्दिष्टाची पूर्तता व व्यवसाय वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे.
…………

*सोबत बातमीत केडीसीसी बँकेचा फोटो वापरावा, ही नम्र विनंती…….!*
===========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!