सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड; १६.६६% बोनस जाहीर!

Spread the news

*सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड; १६.६६% बोनस जाहीर!*

­

 

बेलेवाडी काळम्मा, दि. २८:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची यावर्षीची दिवाळी कारखाना प्रशासनाने गोड केली आहे. चालू वर्षात कामगारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना १६.६६ टक्के बोनस देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गामध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे.

  •  

याबाबत अधिक माहिती अशी, कारखाना व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात बोनस संदर्भात चर्चा झाली. अखेर सर्वांच्या संमतीने १६.६६% बोनसवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा बोनस दिवाळीपूर्वीच कामगारांच्या खात्यात जमा होणार असल्याने कामगारांची दिवाळी यंदा अधिक आनंदात साजरी होणार आहे.

कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, कामगारांचे श्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच कारखान्याने हे यश संपादन केले आहे. हा बोनस म्हणजे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. दुसरीकडे कामगार संघटनेच्यावतीने व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले आहे. कारखाना व्यवस्थापनाचा हा निर्णय कामगारांना अधिक प्रोत्साहन देणारा आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
=========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!