भाजपच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊ तसेच क्रीडा विकासासाठी निधी आणु – भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आश्‍वासन

Spread the news

भाजपच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊ तसेच क्रीडा विकासासाठी निधी आणु – भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आश्‍वासन

­

 

 

  •  

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे स्वागत केले. या दरम्यान कुलगुरुंसोबत कृष्णराज महाडिक यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भाजपच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच क्रीडा विकासासाठी निधी आणण्याचे आश्‍वासन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिले.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास सुरु आहे. अशातच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी, शैक्षणिक उपक्रम राबवणे तसेच विविध सेवा सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने आज भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. विद्यापीठात आवश्यक असणार्‍या सेवा-सुविधांविषयी त्यांनी डॉ. राजनीश कामत यांच्यासोबत चर्चा केली. विद्यापीठात अभ्यासासोबतच, तरुण-तरुणींसाठी क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. आज अभ्यासक्रमासोबतच क्रीडा क्षेत्रालाही महत्व देणे, त्यासाठी आवश्यक असणार्‍या मैदानांची उभारणी, साहित्याची उपलब्धता करुन देणे, यासह क्रीडा विकासाला चालना देणे, यासाठी निधीची गरज आहे. हा निधी भाजपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी महेंद्र चव्हाण यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!