ब्रँड कोल्हापूर 2026 सन्मान सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव
#ब्रँड_कोल्हापूर 2026 सन्मान सोहळा आज अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत संपन्न झाला. यावर्षी जेष्ठ इतिहास संशोधक “रोडमराठाकार” डॉ. वसंतराव मोरे आणि जेष्ठ रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील 30 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार वसंत भोसले, श्रीरंग गायकवाड, कृष्णात चौगले, विश्वास पाटील यांच्यासह कोल्हापूरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवर तसेच ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उपस्थित होते.