प्राचार्य जी.पी. माळी यांच्या ‘काट्यावरची फुलं’ या आत्मकथनाचा 12 नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ
कोल्हापूर
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. जी.पी. माळी यांच्या ‘काट्यावरची फुलं’ या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ गुरुवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात माजी प्रशासकीय अधिकारी आणि प्रबोधनकार इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
अतिशय खडतर प्रवास करत आयुष्याच्या एका यशाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या प्राचार्य माळी यांनी ‘काट्यावरची फुलं’ या आत्मकथनात आपल्या संघर्षाचे आणि यशाचे धागे उलघडले आहेत. अक्षर दालन च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवृत्त पोलीस उप अधीक्षक एन. आर. माळी, नामवंत कवयित्री डॉ. सौ. जयश्री अय्यंगार (बेंगलोर)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अक्षर दालन प्रकाशन व माळी परिवाराने केले आहे.



