मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली ऊसदराची कोंडी फोडल्याबद्दल ऊसमोळी भेट देऊन व्यक्त केली कृतज्ञता शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाल्याच्या भावना

Spread the news

*मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली*

­

 

*ऊसदराची कोंडी फोडल्याबद्दल ऊसमोळी भेट देऊन व्यक्त केली कृतज्ञता*
​
*शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाल्याच्या भावना*
​
कागल, दि. ६ :
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. समन्वयाने संवाद साधत ऊसदराची कोंडी फोडली. त्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी कृतज्ञतापर सत्कार केला. उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना ऊस मोळी भेट देऊन आपल्या कृतज्ञतापर भावना व्यक्त केल्या. आणि दिवाळी समाजात तोंडावरच ही कोंडी फुटल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
​
मंत्री श्री. मुश्रीफ कागल येथील शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असल्याचे समजताच सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला परिसरातील व तालुक्यातील शेतकरी जमू लागले.
कागल येथील शेतकरी हरी बोते म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी ऊसदराची आठवडाभर सुरू असलेली कोंडी फोडली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या हातून सदैव शेतकऱ्यांची सेवा घडत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
​
सिद्धनेर्ली येथील शेतकरी सुभाष मगदूम म्हणाले, गेले तीन-चार दिवस आम्ही रस्त्यावरच आंदोलनात होतो. शेतकऱ्यांची तळमळ असलेले लोकप्रतिनिधी म्हणून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोंडी फोडावी अशी आमची अपेक्षा होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी ती कोंडी फोडली आणि आमची दिवाळी गोड झाली आहे.
​
कागल येथील शेतकरी म्हाळू बिरू पाचगावे म्हणाले, ऐन दिवाळीच्या तोंडावरच निर्माण झालेली ऊसदराची कोंडी फोडून आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गोड केली आहे. आमच्या सर्व शेतकऱ्यांची पुण्याई आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.

  •  

*कंडका पाडला, आनंद झाला…..!*
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांचे अभिनंदन केले व आभारही मानले. बहुतांशी शेतकऱ्यांनी “साहेब, ऊस दराचा तुम्ही तर कंडकाच पाडला आणि ऐन दिवाळीतच आनंदी आनंद झाला,” अशा भावना व्यक्त केल्या…….!
…………….

*कागल: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकार, शेतकरी संघटना व साखर कारखाने यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद साधत ऊसदराची कोंडी फोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी ऊसमोळी देऊन त्यांचा कृतज्ञतापर सत्कार केला व दिवाळी गोड केल्याच्या भावना व्यक्त केल्या.*
=========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!