गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची सदिच्छा भेट

Spread the news

*गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची सदिच्छा भेट*
​
*श्री अंबाबाई देवीची प्रतिमा व गोकुळची उत्पादने भेट देऊन केला सत्कार*
​
मुंबई, दि. १७:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील व संचालकांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांना करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीची प्रतिमा आणि गोकुळची दुग्ध उत्पादने भेट देऊन सत्कार केला.
​
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांची भेट घेतलेल्यांमध्ये गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन व माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, चेतन नरके, अमरसिंह पाटील, रणजितसिंह कृष्णराव ऊर्फ के. पी. पाटील, राहुल पी. एन. पाटील, विरेंद्रसिंह मंडलिक, मदन देसाई, अजित पाटील, रणजितसिंह पाटील (शिरोळ), कार्यकारी संचालक डाॅ. योगेश गोडबोले यांचा समावेश आहे.
=========

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!